Ambadas Danve Suspension Saam Tv
महाराष्ट्र

Ambadas Danve LoP: दानवे-लाड वाद पेटला; सभागृहात शिवीगाळ, अंबादास दानवेंचं निलंबन

Ambadas Danve Suspension: विधान परिषदेत भाजप नेते प्रसाद लाड यांना भर सभागृहात शिवीगाळ केल्या प्रकणी अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनीही कारवाई केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

अंबादास दानवेंनी विधानपरिषदेच्या सभागृहातच प्रसाद लाडांना शिवीगाळ केली. त्यावरून सभागृहात आणि सभागृहाबाहेरही राजकारण पेटलं. दानवेंचं निलंबनही झालं. त्यावरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना सभागृहातच शिवीगाळ केली. त्याचे पडसाद सभागृहातच नाही तर विधानभवनाच्या आवारातही उमटले...दानवेंच्या शिवीगाळनंतर प्रसाद लाडांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. यानंतर दानवेंच्या निलंबनाची मागणी प्रसाद लाडांनी केली.

अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी दानवेंवर कारवाई केली जावी,या मागणीसाठी प्रसाद लाड यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. त्यावेळी माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, मी सभागृह आणि सभापती, सरकारला, तसेच उद्धव ठाकरेंना, महाविकास आघाडीमधील नेत्यांना आवाहन करतो की, याबाबतील शिक्षा विरोधी पक्षाल झाली पाहिजे. विरोधी पक्षाचा राजीनामा झाला पाहिजे. विरोधीपक्षाचं नेत्यांच निलंबन झालं पाहिजे. दानवेंनी दिवंगत आईची माफी मागावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.

प्रसाद लाडांना शिवीगाळ केल्यानंतर दानवे अधिक आक्रमक झाले. माझ्यावर बोट उचलणाराचं बोट तोडू, असा इशाराच दानवेंनी दिला. तर हिंमत असेल तर बोट तोडावं, असं प्रत्युत्तर भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी दिलंय. दानवेंच्या शिवीगाळीने विधानभवन परिसरातील वातावरण गरम झालं होतं. त्यातच विधान परिषदेत दानवेंनी सभागृहाचा अपमान केल्याने त्यांच्यावर 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.

राजकीय नेत्यांच्या भाषेचा स्तर घसरत असल्याची टीका सुरु असतानाच आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने शिवीगाळ केलीय. तर दुसरीकडे विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात थिल्लरपणा होत असेल तर त्यावर ठोस भूमिका घेऊन सभागृहाची पवित्रता राखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT