अमर घटारे
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या हरीसाल येथे वाघाने एक व्यक्तीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतदेह अर्धवट अवस्थेत जंगलात आढळून आला आहे. या घटनेनंतर वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
अमरावतीच्या मेळघाट मधील हरिसाल परिसरात घटना उघडकीस आली आहे. यात मन्नू बाबला जावरकर असे वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून वाघाचे हल्ले झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अन्न व पाण्याच्या शोधात असलेले वन्य प्राणी माणसांवर हल्ले करत आहेत. यात जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या मन्नू यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
जंगलात केवळ सापडले मुंडके
दरम्यान मन्नू जावरकर सोमवारी इंधनासाठी लाकडे आणण्यासाठी शेवरीमुंडा येथील जंगलात गेले होते. परंतु संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दोन दिवस शोध घेतल्यानंतर देखील ते सापडून आले नाही. दोन दिवसांनंतर म्हणजे बुधवारी सकाळी मन्नू यांच्या मुलांना शेवरीमुंडा जंगलात त्यांच्या वडिलांचे मुंडके दिसून आले. घटनास्थळी वाघाने हल्ला करून संपूर्ण शरीर फाडल्याचे आढळून आले.
वनविभागाकाचे पथक घटनास्थळी दाखल
हे दृश्य पाहून घाबरलेल्या मुलांनी तातडीने याबाबत गावात व हरीसाल वनपरिक्षेत्र कार्यालयात माहिती दिली. माहिती मिळताच वनविभाग व पोलीस विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हरीसाल येथील पोलीसांचा अधिक चा तपास सुरू असून, जागेवर पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.