Rajaram Sahakari Sakhar Karkhana saam tv
महाराष्ट्र

Rajaram Sahakari Sakhar Karkhana : 'राजाराम' च्या अध्यक्षपदी अमल महाडिक, उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण

नवनिर्वाचित संचालकांची पहिली सभा आज संपन्न झाली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : काेल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik President Of Rajaram Sahakari Sakhar Karkhana) यांची तसेच उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची एकमताने आज (मंगळवार) निवड झाली. या निवडीनंतर संचालकांनी, सभासदांनी तसेच कार्यकर्त्यांनी दाेन्ही पदाधिका-यांना भावा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Maharashtra News)

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक राज्यात चांगलीच गाजली होती. माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात ही निवडणुक झाली.

या निवडणुकीत महादेवराव महाडिक पॅनलने सतेज पाटील यांच्या पॅनलचा पराभव करत विजय मिळवला होता. आज (मंगळवार) या साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली सभा बोलाविण्यात आली.

या सभेत नवीन अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. नव्या संचालकांची पहिली बैठकीतच श्री राजाराम सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष म्हणून माजी आमदार अमल महाडिक यांची निवड झाली. या कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दिलीप उलपे यांना संधी मिळेल अशी शक्यता हाेती. दरम्यान कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची निवड झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

SCROLL FOR NEXT