Police  Saam Tv
महाराष्ट्र

वर्ष उलटले तरी राज्याला मिळेना पूर्णकालिक पोलीस महासंचालक!

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे महासंचालकांच्या रिक्त पदाबाबत माहिती मागितली होती.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक पद हे मागील 1 वर्षांपासून रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (anil galgali) यांस पोलीस महासंचालक कार्यालयाने दिली आहे. मागील 1 वर्षांपासून पूर्णकालिक महासंचालकाची नेमणूक न झाल्याने सध्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

हे देखील पहा :

आरटीआय (RTI) कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस (Police) महासंचालक कार्यालयाकडे महासंचालकांच्या रिक्त पदाबाबत माहिती मागितली होती. पोलीस महासंचालकाचे वरिष्ठ कार्यासन अधिकारी श्रीकांत पाटील यांनी अनिल गलगली यांस कळविले की पोलीस महासंचालक हे पद 1 जानेवारी 2021 पासून रिक्त आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांस 10 एप्रिल 2021 अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

पोलीस महासंचालक (Police Mahasanchalak) पदासाठी सेवाज्येष्ठतेची यादी तसेच प्रस्तावाची माहिती त्यांच्या महासंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे देखील सांगण्यात आले. अनिल गलगली यांचा अर्ज गृह विभागाकडे हस्तांतरित केला. अनिल गलगली यांनी याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री (Chief Minister) तसेच गृहमंत्री (Home Minister) यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की महासंचालक पद हे महत्वाचे असून तत्काळ नेमणूक होणे गरजेचे आहे. अश्या पदाचा कार्यभार दिले जाणे हे महाराष्ट्र सारख्या प्रगतशील राज्यासाठी भूषणावह नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT