VIRAL VIDEO Saam TV
महाराष्ट्र

VIRAL VIDEO:महिलेच्या अंगावरून गेली धावती ट्रेन; तरीही थांबलं नाही फोनवर बोलणं

ट्रेन अंगावरून गेल्यावर देखील महिला एकदम ठणठणीत आहे.

साम टिव्ही ब्युरो

VIRAL VIDEO:सोशल मीडियावर अनेकदा कल्पनेच्या पलिकडचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यात काही व्हिडिओ असे असतात की, ते पाहिल्यावर भीतीने अंगावर शहारे उभे राहतात. आता देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एका महिलेच्या अंगावरून एक ट्रेन भरधाव वेगाने निघून जाते. मात्र त्या महिलेला काहीच दुखापत होत नाही. (Latest Marathi News)

संपूर्ण ट्रेन अंगावरून जाताना ही महिला रेल्वे रुळांमध्ये झोपून घेते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेन किती वेगाने पुढे जात आहे. ट्रेन अंगावरून गेल्यावर देखील महिला एकदम ठणठणीत आहे. एवढेच नाही तर ती मस्त फोनवर बोलण्यात गुंग झाली आहे. अंगावरून ट्रेन गेल्याची तिच्या चेहऱ्यावर तिळमात्र भीती दिसत नाही.

महिलेचा हा व्हिडिओ (Video) आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रेल्वे (Train) अपघात झाल्याने अनेकांना अपला जीव गमवावा लागतो. मात्र महिलेला जिवंत पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ नरेंद्र सिंह यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. एका नेटकऱ्याने यावर कमेंट करत म्हटले आहे की, आयुष्यापेक्षा फोनवर बोलणं या महिलेसाठी महत्वाचं आहे. तर इतर युजर्सने महिलेच्या अपघातावर आर्श्चर्य व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार

Stress Relief At Work: ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा 'ही' योगासने

Parola Waterfall: धबधब्यावर भिजायला जायचंय? मग 'पारोळा धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Shani Shingnapur : शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरण; धक्कादायक माहिती आली समोर, कर्मचाऱ्यांच्या खात्यात १ कोटीहून अधिक रक्कम जमा

SCROLL FOR NEXT