eknath shinde News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : युतीचा पोपट २०१४ साली मेला, आता सर्वाधिक आमदार निवडून आले; शिंदे गटाच्या महिला नेत्याने सांगितलं कारण

eknath shinde News : २०२४ साली सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. शिंदे गटाच्या महिला नेत्याने कारण सांगितलं आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाने २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली होती. शिंदे गटाचे ५७ आमदार निवडून आले. तर ठाकरे गटाला २० आमदारांवर समाधान मानावं लागलं. शिंदे गटाच्या कामगिरीचं कारण शिवसेनेच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. युतीचा पोपट 2014 साली मेला. आता त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले. याच कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचं काम आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

शिवसेनेचे २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६३ आमदार जिंकले होते. तर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत ५६ आमदार निवडून आले होते. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. मात्र, अडीच वर्षानंतर शिवसेनेत फूट होऊन एकनाथ शिंदे हे भाजपच्या साथीने मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी पुढील अडीच वर्ष कारभार सांभाळला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे ५७ आमदार निवडून आले. त्याचे श्रेय नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाला दिलं आहे.

नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे की, '२०१४ साली युतीचा पोपट मेला. आता जास्त आमदार जिंकले आहेत. याचं कारण एकनाथ शिंदे यांचं काम आहे. सगळे लाड करतात. मी थोडी शिस्त लावली की वाईट वाटतं. मी आज काही बोलायचं नाही हेच ठरवलं होतं. मला नाही वाटतं तुम्ही दारिद्र्य रेशेखालील शिवसैनिक आहात. एक पाटी लावायला हवी, सगळ्यांकडे छान छान गाड्या आहेत, त्या असायलाच हव्यात'.

'एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान झालं असं दिसताच संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन झालं पाहिजे. आपण सत्तेत आहोत म्हणजे आंदोलन करायचं नाही असं अजिबात नाही. लाडक्या बहिणींना अजूनही वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहेत. लाडक्या बहिणीला लाच नाही, तर जगण्याचा अधिकार दिला हे समजावून सांगा, असे गोऱ्हे पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT