Chandrasekhar Bawankule Saam Tv
महाराष्ट्र

Bawankule News: सर्व पक्ष, सर्व जनता मराठा आरक्षणाच्या बाजूने मग नेत्यांना गावबंदी का?: चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

Maratha reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी आक्रमक पवित्र घेतलाय. ठिकठिकाणी रस्ता रोको केले जात आहेत.

Bharat Jadhav

अभिजीत देशमुख

Chandrasekhar Bawankule on village Ban:

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. सर्व पक्ष, सर्व जनता आरक्षणाच्या बाजूने आहे. तरी नेत्यांना गावबंदी आणि रास्ता रोको केले जात आहेत, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. (Latest News)

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठी संघटनांनी आक्रमक पवित्र घेतलाय. ठिकठिकाणी रस्ता रोको केले जात आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलीये. राजकीय नेत्यांच्या वाहने अडवून त्या फोडल्या जातायत. दौऱ्यावर जाणाऱ्या नेत्यांना काळे झेंडे दाखवले जात आहेत. सरकार सकरात्मक असून असं का केलं जात आहे, असा सवाल बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची जाहीर घोषणा केली. ज्या उद्धव ठाकरे सरकारने मराठा आरक्षण घालवलं. त्या सरकारला लाथ मारून मर्द मराठा मुख्यमंत्री शिंदे मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता संकल्प करत आहेत. मराठा आरक्षणाला कोणीही विरोध करत नाही.

राज्यातले विधिमंडळ राज्यातली पूर्ण कॅबिनेट ,राज्यातले सर्व पक्ष, सर्व जनता, मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे, त्यामुळे मला वाटतं मराठा समाजाला सर्वांचे समर्थन आहे. मग गाव बंदी किंवा नेत्यांना रोखणे याचा विचार झाला पाहिजे, असं बावनकुळे यांनी म्हटलंय.मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एक दिवशीय अधिवेशन घ्यावं अशी मागणी केली होती.

ाबाबत बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणासाठी जे जे होईल ते करत आहेत. सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक दिवसीय अधिवेशन घेतलं तरी आम्हाला ते मान्य असेल. परंतु मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारचा संबंध आलेला नाही. तर मोदीजी काय बोलणं करतील ,राज्य सरकारने न्यायालयाने सुचवलेल्या बाबींप्रमाणे कारवाई करायची आहे ,त्यानंतर केंद्र सरकारची भूमिका येईल उगाच मोदीजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT