Alibaug Traffic Jam: 18-month-old Child Dies In Ambulance 
महाराष्ट्र

अलिबागच्या रस्त्यावर यम फिरतोय; वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव

Alibaug Traffic Crisis: आता बातमी आहे वाहतूक कोंडीमुळे बळी गेलेल्या दीड वर्षांच्या बाळाची. राज्यात खड्ड्यांनी अनेकांचे बळी घेतले. मात्र आता वाहतूक कोंडी अनेकांच्या जीवावर उठलीय. आणि यामुळे एका बाळाचा कसा जीव गेला पाहूयात हा रिपोर्ट.

Rohit Kadam

  • आरांश ठाकूर या चिमुरड्याचा अलिबाग वाहतूक कोंडीत दुर्दैवी मृत्यू

  • बेलकडे ते अलिबागदरम्यान रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी

  • अलिबागमधील वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह

राज्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. खड्डे अपघातांची मालिका थांबली असली तरी वाहतूक कोंडी मात्र कायम आहे. आणि याच वाहतूक कोंडीनं चिमुरड्याचा जीव घेतलाय. अलिबागमध्ये रस्त्याच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दीड वर्षांच्या आरांश ठाकूर याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाकडे जाताना बेलकडे ते अलिबाग दरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीत आरांशनं रुग्णवाहिकेतच आपले प्राण सोडले. आरांशसोबत नेमकं काय घडलं ते पाहूयात?

दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास आरांशने खेळता-खेळता अचानक एक फुगा गिळला. हा फुगा थेट त्याच्या घशात जाऊन अडकल्याने आरांशचा श्वास गुदमरू लागला. त्यानंतर पालकांनी आरांशला तातडीनं अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडली. तब्बल 2 तासांच्या जीवघेण्या प्रतीक्षेनंतर त्या वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिका बाहेर पडली. अखेर दुपारी 4च्या सुमारास रुग्णवाहिका अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचली. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करताच चिमुकल्या आरांशला मृत घोषित केले.

अलिबागमधील निष्पाप चिमुड्याच्या मृत्यू प्रकरणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या दुर्घटनेला प्रशासनाची दिरंगाई जबाबदार असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. तर आरोग्यमंत्र्यांनी अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय.

विशेष म्हणजे, याआधी सप्टेंबर 2025 मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे गंभीर जखमी असलेल्या 16 महिन्यांच्या चिमुरड्याचा जीव गेला होता. त्यानंतर आता आरांशच्या मृत्यूमुळे अलिबागमध्ये रस्ते विकास आणि कामांच्या नावाखाली सुरू असलेला अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. इतकंच नव्हे तर आरांशच्या मृत्यूनंतर जाग आलेल्या प्रशासनानं वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ट्रॅफिक पोलीस नेमलेत. मात्र, आरांशचा जीव गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आलीय. मात्र यावर कायमचा तोडगा काढला नाही तर वाहतूक कोंडीचा यम आणखी अनेकांचे बळी घेतल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठवाड्यात पाणीटंचाई की टँकरचा गोरखधंदा? कृत्रिम पाणीटंचाईनं टँकर माफिया मालामाल?

Weather Update: 'अकवान' चक्रीवादळाचं रौद्ररूप; 100 Kmph वेगाचं वादळ अन् ढगांचा गडगडाट, 'या' राज्यांमध्ये धो-धो कोसळणार पाऊस

Gratuity : ५ वर्षांच्या आत नोकरी सोडली तरीही ग्रॅच्युइटी मिळेल, उच्च न्यायालयाच्या महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन वेतन नियम लागू; आठवड्यात किमान ४८ तास काम, सुट्टीच्या दिवशी काम केल्यास दुप्पट पगार

निषेधाच्या नादात फाडला बाळासाहेबांचा फोटो; ठाकरेसेनेचा मुंबई महापालिकेत निषेध मोर्चा

SCROLL FOR NEXT