Alibaug Pnp fire  Saam Tv
महाराष्ट्र

अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग; अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

अलिबागमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात मोठी आग लागली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अलिबाग : अलिबागमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात मोठी आग लागली आहे. सायंकाळी ५ वाजण्याचा सुमारास आग (Fire) लागली आहे. या आगीचे आणि धुरांचे लोळ आकाशात पसरले आहे. आगीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती होताच घटनास्थळी अलिबाग (Alibaug) नगरपालिका आणि आर सी एफ बंब दाखल झाले. ( Alibaug Fire News In Marathi )

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागली. सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारे आग लागली. नाट्यगृहात आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाट्यगृहाच्या परिसरातील लोकांची आगीमुळे एकच धावाधाव झाली. परिसरातील लोकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र आगीने भीषण रुप धारण केलं. त्यामुळे घटनास्थळावरील लोकांनी घटनेची माहिती अग्नीशमन दलाला दिली. त्यानंतर अलिबाग नगरपालिका व आर सी एफ बंब दाखल झाले. आगीमुळे घटनास्थळी लोकांची बघ्यांची एक गर्दी जमा झाली होती. या नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर अलिबाग नगरपालिका व आर सी एफ बंब दाखल झाले.

अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात आज कोणताही कार्यक्रम नव्हता. आज नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी भीषण आग लागली. सुदैवाने नाट्यगृहात कोणताही कार्यक्रम नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अलिबाग नगरपालिका व आर सी एफ बंब दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याची माहिती मिळली आहे. त्यामुळे घटनास्थळाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची संकटातून सुटका झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT