Alibag Jail Saam TV
महाराष्ट्र

35 फूट तटबंदीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न अंगाशी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ही घटना 31 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: 30 जानेवारी रोजी पेण पोलीस कस्टडीतुन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी बिरू महतो याने अलिबाग जिल्हा कारागृहातूनही 35 फूट दगडी तटबंदीवरून पळून जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला मात्र तोही असफल झाला आहे. दगडी भिंतीवरून उडी मारल्याने त्याच्या पाय फ्रॅक्चर झाला आहे. अलिबाग पोलिसांनी (Alibag Police) दहा मिनिटात आरोपी बिरू याचा शोध घेऊन अटक केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पेण पोलीस (Pen Police) ठाण्यातील कोठडीत हाफ मर्डरबाबत बिरू महतो अटक होता. 30 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बिरू याला शौचालयाला बाहेर काढले. यावेळी बिरू याने पोलिसांची नजर चुकवून बाजूच्या भिंतीवरून पलायन केले. या प्रकाराने पोलिसांची धावपळ सुरू झाली. अखेर बारा तासाने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आरोपीची पोलीस कोठडी संपली असल्याने 31 जानेवारी रोजी पेण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सूनावल्याने आरोपीला अलिबाग येथील जिल्हा कारागृहात आणले.

जिल्हा कारागृहात सायंकाळी सात वाजता आणले असता कारागृह अंमलदाराला धक्का देऊन आरोपी बिरू याने कारागृहाच्या 35 फूट दगडी तटबंदीवरून उडी मारून पलायन केले. त्यामुळे कारागृहात खळबळ माजली. कारागृह पोलीस प्रशासनाने तातडीने याबाबतची वर्दी अलिबाग पोलीसांना दिली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन अलिबाग पोलीसांनी तात्काळ कोँबिंग ऑपरेशन सुरु केले. कारागृहा लगतच्या परिसराची झाडाझडती सुरु करण्यात आली. दहा मिनटातच एका घरामागील सरपण ठेवण्याच्या जागेत तो लपलेला आढळून आला.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी बिरू महतो याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT