Akshay Shinde Encounter Audio Clip Saam TV
महाराष्ट्र

Badlapur Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर मी पाहिला, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

Akshay Shinde Encounter Audio Clip : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.

Satish Daud

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी २३ सप्टेंबर रोजी मुंब्रा बायपासला एन्काऊंटर केला. तळोजा जेलमधून पोलीस अक्षय शिंदेला बदलापूर येथून घेऊन येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले. स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे मारला गेला, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे विरोधकांनी मात्र यावर बोट ठेवलं असून इतर आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारण्यात आलं का? असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका...", असं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती", असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे. सोबतच त्यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवेळी नेमकं काय घडलं? पोलिसांची व्हॅन कुठून जात होती? एन्काऊंटर कसा झाला, याबाबत कथित प्रत्यक्षदर्शीचा ऑडिओ संवाद आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय संवाद?

"कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत फोनवरून संवाद साधत आहे. अक्षय शिंदे याला पोलिसांच्या ज्या व्हॅनमधून नेलं जात होतं. त्या व्हॅनच्या पाठीमागे मी होतो, असा दावा कथित प्रत्यक्षदर्शी करीत आहेत. पोलिसांच्या व्हॅनला पडद्याने झाकण्यात आलं होतं. मात्र गाडी धावत असताना अचानक तीन ठक् ठक् ठक् असे आवाज झाले.

"मला वाटलं की गाडीच्या काही पार्ट्सचा आवाज झाला त्यामुळे मी दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने मी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर झाल्याची बातमी पाहिली. भीतीपोटी मी कुणालाही याबाबत काहीच सांगितलं नाही", असंही हा व्यक्ती सांगत आहे. दरम्यान ही ऑडिओ क्लिप नेमकी कुणाची आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

Maharashtra Live News Update : सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Cotton Saree Blouse Patterns: कॉटनच्या साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, नक्की ट्राय करा

Tomato Facepack For Glowing Skin: चेहऱ्यावर हवीय गुलाबी चमक? मग 'या' पद्धतीने लावा टोमॅटोचा फेस पॅक

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT