50 गाड्यांचा ताफा घेऊन छोटा राजनचा पुतण्या नाशकात; सुहास कांदे धमकी प्रकरण अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

50 गाड्यांचा ताफा घेऊन छोटा राजनचा पुतण्या नाशकात; सुहास कांदे धमकी प्रकरण

नाशिकचे पोलीस आयुक्त पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिकः शिवसेना आमदार सुहास कांदे (ShivSena MLA) यांच्या भुजबळ यांच्याविरोधात केलेली याचिका माघे घेण्यासाठी छोटा राजनच्या पुतण्याने धमकी देत फोन केल्याच्या आरोपानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणावर चौकशीचे आदेश काल (ता. १ ऑक्टोबर) दिले होते. या प्रकरणी चौकशीसाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Chhota Rajan) पुतण्या अक्षय निकाळजे यांना ED ने समन्स बजावण्यात आले होते. त्याच्या चौकशीसाठी आज अक्षय निकाळजे नाशकात दाखल झाले आहेत.

हे देखील पहा-

सुहास कांदे यांनी धमकीच्या फोनची तक्रार नाशिक गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले होते. फोनच्या चौकशीसोबतच अक्षय निकाळजे यांच्या फोन रेकॉर्डिंग्सची सुद्धा चौकशी होणार आहे. असे सांगण्यात आलं होत. त्यामुळे आज या चौकशीसाठी नाशकात दाखल झाले आहेत. तर पोलीस निकाळजे यांचा जबाब नोंदवणार आहेत.

अक्षय निकाळजे आज जवळपास 50 गाड्यांचा ताफा घेऊन हजार झाले आहेत. ते पाहण्यासाठी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.

सुहास कांदे यांचा आरोप;

शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे घेण्यात यावी यासाठी अंडरवर्ल्डचा डॉन छोटा राजनच्या पुतण्याने सुहास कांदे यांना धमकीचा फोन केल्याचा आरोप कांदे यांनी केला होता. तर या प्रकणासाठी कांदे यांनी याबाबत नाशिक पोलिस आयुक्तांना पत्रही दिले होते.

अक्षय निकाळजे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले;

त्यानंतर अक्षय निकाळजे यांनी सुहास कांदे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. अक्षय निकाळजे यांच्या म्हणण्यानुसार, कांदे यांचे मोठे भाऊ टोलनाका चालवतात. टोलनाक्यावर कार्यकर्त्यांची मारहाण झाली. त्यासाठी मी कांदे यांना फोन केला होता असे अक्षय निकाळजे यांनी स्पष्टीकरण दिले होते. पुढे अक्षय निकाळजे म्हणाले, मी कांदे यांना फोनवर कुठल्याच प्रकारची धमकी दिली नाही. शिवाय भुजबळ यांच्या विरोधातील याचिका माघे घ्या या संदर्भात आमचे कोणतेच बोलणे झाले नाही. मी भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही, असे अक्षय निकाळजे यांनी पलटवार केला होता. तर मीच आता सुहास कांदे विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकार सोने खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणणार नवा प्लॅन

Maharashtra Live News Update : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या 40 फूट उंच होर्डिंग चे लोकार्पण

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT