Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: महाविकास आघाडीत अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांनीच लढावी : संजय राऊत

Sanjay Raut On Prakash Ambedkar: आंबेडकरी विचारांची जनता मोदींना पाठिंबा देणार नाही. प्रकाश आंबेडकर यांचाही हाच विचार आहे. संविधानाचे रक्षण झाले पाहिजे, असं संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.

Ruchika Jadhav

अभिजीत सोनवणे

Political News:

महाराष्ट्रातील लोकसभेसाठी जागा वाटपावरून खासदार संजय राऊतांनी वंचितसाठी मोठी मागणी केली आहे. महाविकास आघाडीत अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांनीच लढावी ही आमची मागणी असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार यावरून महाविकास आघाडीत दावे केले जात आहेत. शिवसेनेने (उद्धव बाळासाहे ठाकरे) २३ तर वंचित बहुजन आघाडीने १२ जागांची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेना आणि वंचितची युती आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी अद्यापही महाविकास आघाडीत सहभागी झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वंचित येणार का? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर संजय राऊतांनी मोठा दावा केलाय.

वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे, असं राऊतांनी ठामपणे सांगितलंय. यांच्याशी 6 ते 7 वेळा यावरून सविस्तर चर्चा झाली. ती चर्चा सकारात्मक झाली असून निर्णय देखील झाला आहे. आंबेडकरी विचाराची जनता मोदींना पाठिंबा देणार नाही. प्रकाश आंबेडकर यांचाही हाच विचार आहे. संविधानाचे रक्षण झाले पाहिजे, असं संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.

जागा वाटपावरून यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील भाष्य केलं. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना एका-एका जागेसाठी उठून दिल्लीत जायला लागू नये यासाठी आम्ही त्यांची सोय पाहातोय. प्रत्येक जागेसाठी वाद झाला तर त्यांना दिल्लीत जावं लागतं, अशा शब्दांत संजय राऊतांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना टोला लगावलाय.

देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांनी काल एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना उद्देशुन टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांच्या गळ्यात सध्या दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे. मानेचा पट्टा हा एक आजार असतो, असे आजार अनेकांना होत असतात. अमित शाहाही आजारी असतात, मोदीही आजारी पडू शकतात, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT