अवैध बायोडिझल पंपावर पोलिसांचा छापा  जयेश गावंडे
महाराष्ट्र

अवैध बायोडिझल पंपावर पोलिसांचा छापा

लाखो रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना अटक

अॅड. जयेश गावंडे

अकोला - पातूर रोडवरील हिंगणा फाट्याजवळ अवैधरित्या बायोडिझलची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात बायोडिझल जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी बायोडिझलची सर्रासपणे विक्री सुरू आहे. कुठलाही परवाना अथवा लायसन्स नसलेले अनेक जण बायोडिझलच्या विक्रीचा व्यवसाय करत आहेत.

हे देखील पहा -

असाच एक प्रकार हिंगणा फाट्याजवळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी अवैधरित्या बायोडिझल पंप टाकून बायोडिझलची साठवनुक करून जास्त दराने विक्री केली जात होती. यावरून पोलिसांनी मोहम्मद फैजान मो इस्लाम, असदखान सैफ उल्लाहखान आणि तकदीर सिंग रामप्रकाश चव्हाण यांना बायोडिझल विकताना रंगेहाथ अटक केली आहे.

या आरोपींकडून एक ट्रक ज्यामध्ये अवैध रित्या बायोडिझेलची साठवणूक केली जात होती. तब्बल 1000 लीटर बायोडिझल, पंपाचे साहित्य, डिझेलच्या 29 बेरेल असा एकूण 30 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणातील सूत्रधार मालक हा सध्या फरार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT