Akola अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola: म्हणून जावयाने मेहुण्याच्या खांद्याला चावा घेतला

बायकोचा भाऊ म्हणजे मेहुणा

अॅड. जयेश गावंडे

अकोला: बायकोचा भाऊ म्हणजे मेहुणा...जावई आणि मेहुण्याचे नाते एक वेगळं नातं असत. मात्र, याच नात्यात एक अजब घटना घडली आहे. जावयाने आपल्या मेहुण्याला चावा घेतला आहे. अकोल्यातील (Akola) पातूर पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी पातुर (Patur) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा रामेश्वर चव्हाण या महिलेने पातुर पोलिसात (Police) तक्रार दिली की, तिच्या पतीने तिचा भाऊ याच्या खांद्याला चावा घेऊन नवऱ्याला जखमी केले आहे.

हे देखील पहा-

पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पती रामेश्वर पुरण चव्हाण याचे विरुद्ध अपघात क्रमांक 161/ 22 कलम 324 323 504 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी (Accused) रामेश्वर चव्हाण आणि त्याची पत्नी शोभा चव्हाण यांच्यामध्ये नेहमी वाद होत असल्याने शोभा चव्हाण ह्या माहेरी राहायला आले होते. दरम्यान शनिवारी पती रामेश्वर चव्हाण हा शोभा याना घ्यायला आला होता. मात्र, दरम्यान दोघात वाद झाला. यामध्ये मेहुणा वादात आल्याने जावयाने मेहुण्याच्या खांद्याला कडकडून चावा घेऊन जखमी केले आहे.

शोभा चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये भावाला चावा तर घेतलाच शिवाय मारहाण सुद्धा केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पातूर पोलिस करीत आहेत अशी माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घरगुती वादातून अनेकांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. घरगुती वादातून अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे क्षुल्लक कारणासाठी वाद करू नका.. नात्याला जपा.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT