Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: धक्कादायक..पंधरा दिवसांवर लग्न; युवकाच्‍या टोकाच्‍या निर्णयाने दोन्‍ही परिवार दुःखाच्‍या खाईत

पंधरा दिवसांवर लग्न; युवकाच्‍या टोकाच्‍या निर्णयाने दोन्‍ही परिवार दुःखाच्‍या खाईत

जयेश गावंडे

अकोला : पंधरा दिवसांवर लग्न येऊन ठेपले होते. घरात आनंदी वातावरण व लग्‍नाच्‍या तयारीची लगबग सुरू होती. परंतु, भावी नवरदेवाने लग्‍नाच्‍या काही दिवसांपुर्वीच टोकाचे पाऊल उचलल्‍याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Maharashtra News)

अकोल्यातील (Akola) बाळापूर तालुक्यातल्या मोरगाव येथील २८ वर्षीय युवकाने गायगाव येथे रेल्वेखाली (Railway) आत्महत्या केल्याची घटना घडली. मोरगाव भाकरे येथील अजय उर्फ गजानन रामदास भोंबळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाने गायगाव रेल्वे स्थानकासमोर रेल्वेखाली स्वतःला झोकून आत्महत्या केली.

दोन्‍ही परिवारावर दुःखाचा डोंगर

अजय भोंबळे याचे पंधरा दिवसांवर २७ जानेवारीला लग्न होते. परंतु, लग्‍नापुर्वी युवकाने इतके टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दोन्ही परिवारात लग्नाची तयारी सुरू असताना युवकाच्‍या आत्‍महत्‍येमुळे वधूकडील परिवारावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

Mirzapur The Movie: गुड्डू पंडित आणि कालीन भैय्याचा भौकाल; मिर्झापूरमध्ये पुन्हा रंगणार रक्तरंजीत थरार

SCROLL FOR NEXT