Liqour Ban Saam tv
महाराष्ट्र

Liqour Ban : दारूबंदी विरोधात महिलांचा एल्गार; शेड- हातगाड्यांची केली तोडफोड

Akola News : अवैध दारूविक्री विरोधात गावातील महिलांकडून अनेकदा पोलीस तक्रारी केल्या होत्या. मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर गावातील दारूच्या गुत्त्यावर महिलांनी प्रचंड राडा केल्याचे पाहण्यास मिळाले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : गावात सर्रासपणे होत असलेल्या दारू विक्रीला त्रासलेल्या महिलांनी आज रौद्र रूप धारण करत या विरोधात एल्गार पुकारला होता. गावातील दारूच्या गुत्त्यावर महिलांनी प्रचंड राडा केला. यात महिलांनी एकत्रित येत गावात दारू विक्री होत असलेले टीन शेड आणि हातगाड्यानची तोडफोड केली. यामुळे गावात दारूबंदी विरोधातील वातावरण तापले होते. 

अकोला शहरालगतच्या गुडधी गावात दारू विरोधात मातृशक्तीचा एल्गार पाहण्यास मिळाला. गावात अवैधपणे विक्री होत असलेल्या दारू बंदीची अनेकदा मागणी करण्यात आली होती. मात्र दारू बंदी होत नसल्याने गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक झाल्या होत्या. यासाठी महिलांनी एकत्र येत दारू विक्री होणाऱ्या घरांवर स्वतः छापा मारला. महिलांनी आक्रमक होत दारू विक्री करणाऱ्यांच्या घरातील दारू साठा उध्वस्त केला. 

टिन शेडची केली तोडफोड 

गुडधी गावातील अवैध दारू विक्री विरोधात गावातील महिलांकडून अनेकदा पोलीस तक्रारी केल्या होत्या. मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे महिलांनी आज गावात दारू विक्री होत असलेले टीन शेड आणि हातगाड्यांची देखील तोडफोड केली‌. गावातील दारूच्या गुत्त्यावर महिलांनी प्रचंड राडा केल्याचे पाहण्यास मिळाले. महिलांच्या आक्रमकतेमुळे दारू विक्रेत्यांची पाचावर धारण बसली.

महिलांनी केले गंभीर आरोप 

मात्र, सिव्हिल लाईन पोलिसांचे दारू विक्रीच्या प्रकाराकडे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष होते. पोलिसांच्या आशीर्वादाने गुडधीमध्ये बिनबोभाटपणे दारू विक्री सुरू असल्याचा महिलांचा गंभीर आरोप आहे. महिला आक्रमक झाल्यानंतर गावात पोलीस दाखल झाले. पोलिसांचा आक्रमक महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या महिला दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाईच्या मागणीसाठी आग्रही असून गुडधी गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair Home Remedies: केस खूप पांढरे झालेत? शाईनपण गेली? मग वापरा 'हे' खास हेल्दी तेल

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार? युद्धावरून मुस्लिम देशांत खलबतं

Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

SCROLL FOR NEXT