Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : रस्त्याच्या प्रश्नासाठी अनोखे आंदोलन; आधी केले मुंडन मग रस्त्यावर म्हैस आणत निषेध

Akola News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळ व 'निर्भय बनो जन आंदोलन'च्या वतीने गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: अकोला शहरातल्या तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याच्या अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधून (Akola) त्याचे काम तातडीने सुरु करण्यात यावे; या मागणीसाठी आज अनोखे आंदोलन उभारण्यात आले. यात सुरवातीला मुंडन करून रस्त्यावर म्हैस आणत निषेध नोंदविण्यात आला. (Live Marathi News)

अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यासाठी शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळ व 'निर्भय बनो जन आंदोलन'च्या वतीने गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले. इतकेच नव्हे तर म्हैस आणून त्याद्वारे रस्त्याच्या मधोमध निषेध व्यक्त करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्ता त्वरित व्हावा म्हणून शासन, प्रशासनास जन प्रतिनिधी यांना पाचवेळा निवेदन दिले आहेत. तसेच अनेकवेळा आंदोलन केली आहेत. परंतु शासनाने आश्वासने देऊन आंदोलन संपवली. परंतु तुकाराम चौक ते मलकापूर या अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे काम अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे तुकाराम चौकात हे उपोषण सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT