Accident Saam tv
महाराष्ट्र

धूम स्टाइल हौस जीवघेणी, १० महिन्यांत ९७ अपघात, ७५ घटनांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचा बळी

दहा महिन्‍यात ९७ पैकी 75 अपघात अठरा वर्षाच्यामधील मुलांचे

जयेश गावंडे

अकोला : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. अकोल्यात (Akola) आयआरएडीच्या रिपोर्टनुसार दहा महिन्यात झालेल्या 97 पैकी अपघात हे 75 अठरा वर्षाच्या मधील मुलांचे आहेत. (Letest Marathi News)

अल्पवयीन मुलांना बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते. या मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे पादचारी नागरिकांच्या जिवालाही धोका (Accident) पोहोचत आहे. या हौशी मुलांना आवर घालण्यासाठी आता अकोल्यात आरटीओने (RTO) कठोर पाऊल उचलले आहे.

राज्यभरात दरवर्षी रस्ते अपघातात (Accident News) जवळपास 20 हजार व्यक्‍तींचा मृत्यू होतो. मुलगा चांगल्या गुणाने दहावी अथवा बारावी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात पालकांकडून त्याला मोबाईल किंवा दुचाकी भेट दिली जाते. काही तरुण मुलांना नुकतीच 18 वर्षे पूर्ण झालेली नसतात, त्यांना वाहतूक नियमांची पुरेशी माहितीदेखील नसते, तरीही पालक त्याच्या ताब्यात वाहन देतात. त्यामुळे मोबाईल टॉकिंग, रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे, अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे असे प्रकार वाढले आहेत.

मोटर वाहन अपघात डेटा (IRAD) रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. या रिपोर्टप्रमाणे जानेवारी ते ऑक्टोबर 2022 यादरम्यान एकूण 97 मोटर वाहन प्राणघातक एक्सीडेंट झाले. त्यापैकी 75 प्राणघातक (फॅटल) एक्सीडेंट हे अठरा वर्षाच्या खालील मुलांची होते. त्यामुळे आता वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, रस्ते अपघातावर नियंत्रण आणून अपघाती मृत्यू कमी करण्यावर आरटीओ व वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर दंडात्मक कारवाई करून नोटीस पाठवण्यात येत आहे. आरटीओकडून ही मोहीम अकोल्यात राबविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : अकोल्यातील जवान नितेश घाटे यांना अयोध्येत वीरमरण; कर्तव्यावर असताना दुर्दैवी घडलं

Pune Rave Party: नवऱ्याला वाचवण्यासाठी रोहिणी खडसेंनी अंगावर चढवला वकिलीचा कोट, कोर्टात नमकं काय घडलं?

Hair Style: श्रावणात सणासुदींना साडीवर करा 'या' सुंदर बन हेअरस्टाइल्स

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

SCROLL FOR NEXT