ST Bus Saam Tv
महाराष्ट्र

Akola News : गावाचा रस्ता खराब, मग ‘लालपरी’चा रामराम, एसटीचा मोठा निर्णय

ST BUS News : धामणा आणि बोरगाव वैराळे गावांना अकोला एसटी आगाराने इशारा दिला आहे. रस्ते दुरुस्त करा अन्यथा बस फेऱ्या बंद. अपघात व एसटीच्या नुकसानीवर नियंत्रणासाठी महत्त्वाचा निर्णय.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Exclusive : गावाचा रस्ता खराब? मग, होणार ‘लालपरी’ला ‘रामराम’... होय!, आता खराब रस्ता असलेल्या गावांत बस सेवा होणार बंद.. अपघात आणि एसटीचं नुकसान टाळण्यासाठी 'एसटी डेपो' महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. अकोल्यातल्या खड्डेमय रस्ते असलेल्या 2 गावांना अकोला एसटी आगाराकडून सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गावचे रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फेऱ्या रद्द करू, असा थेट इशारा एसटी आगाराने 2 ग्रामपंचायतला पत्राद्वारे दिला आहे.

अकोल्यातल्या धामणा आणि बोरगाव वैराळे ग्रामपंचायतला अकोला एसटी आगाराने पत्र देत एसटी बस फेऱ्या रद्द करण्याचं कळवलंये. अकोल्यातल्या धामणा ते हातरून या 10 किमी अंतराचा पूर्णतः खड्डेमय झालाय. त्यामुळं वर्षभरातचं एसटी बसचं मोठं नुकसान होतंय. तसंच या खड्डेमय रस्त्यांवरून धावताना अपघाताचीही भीती तितकीचं जास्त राहतं. परिणामी, प्रवाशांचा जीव धोक्यात येतोय. यासाठीच अकोला 'एसटी डेपो'नं मोठं पाऊल उचलायला सुरुवात केली. खराब रस्त्यांची यादीतील गावांना एसटी महामंडळाकडून हटवली जात आहे.

अकोल्यातल्या 'धामणा' आणि 'बोरगाव वैराळे' या गावांचा रस्ता खराब आणि खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या गावातील बससेवा बंद होण्याची शक्यता आहे. बस सेवा बंद करण्याचा इशाराही 'अकोला एसटी डेपो'ने दोन्ही ग्रामपंचायतीला दिला आहे. गावचे मुख्य रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फेऱ्या रद्द करू, असा पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळवण्यात आलेत. त्यानंतर दोन्ही गावच्या गावकऱ्यांसह ग्रामपंचायतिला मोठा धक्का बसलाय..

गावाची बस सेवा बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बस सेवा रद्द करण्याबाबतचा विचार मागे घ्यावा, असा आग्रह आता गावकरी धरतायेत. अकोला ते धामणा रस्त्यावर दिवसभरात तीन वेळा बस फेऱ्या सुरु आहेत. या मार्गावरील प्रवास हा जवळपास पाऊण तासाचा आहे. परंतु खड्डेमय रस्त्यामुळं तासावर हा प्रवास गेलाय. तसंच खराब रस्त्यामुळे एसटीचं मोठं नुकसान आणि वाहन चालवताना त्रास होत असल्याचं एसटी चालक सांगत आहेत. एकंदरीत धामणा आणि बोरगाव वैराळे गावची 'लालपरी' बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्टचं संकेत दिसतायेत.. असे असले तरी दोन्ही ग्रामपंचायतीने एसटी महामंडळाला काहीसा वेळ मागितला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले

Vasai-Virar Tourism : रिमझिम पावसात समुद्रकिनारी चिंब भिजा, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसईत लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT