Prakash Ambedkar on OBC reservation Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसींचं आरक्षण जाणार; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

Prakash Ambedkar on OBC reservation : विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी समाजाचं नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण संपणार, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Satish Daud

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाबाबत बोलताना एक खळबळजनक विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका असून शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण जाणार, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसेल, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली असून आरक्षणावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.

रविवारी अकोला येथे भव्य धम्म प्रवर्तन दिनाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसींना उमेदवारीच द्यायची नाही हे प्रस्थापितांचे धोरण आहे. त्यामुळं ओबीसींच्या आरक्षणाला धोका आहे".

"विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसींची जनगणना करून त्यांचं शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण ठरवलं जाईल. तोपर्यंत आरक्षण थांबवलं जाईल. मात्र, वंचितला ओबीसी समाजाचे १०० उमेदवार निवडून आणायचे आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मतदान करा म्हणणारे आंबेडकरवादी, संविधानवादी आणि अधिकारी आहेत. मात्र, ते आरक्षणामुळे अधिकारी याचा त्यांना विसर पडला आहे", असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "सध्या ओबीसी समाज म्हणतोय की आमच्या ताटात मराठा समाज नको. तर दुसरीकडे मनोज जरांगे म्हणता आहे की, आम्ही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण घेणार. हा राजकीय आणि मतांचा संघर्ष आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसींची जनगणना केली जाईल. त्यानंतर आरक्षणाला धोका असेल. ओबीसींचं शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणही जाणार", असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT