Akola News Saam TV
महाराष्ट्र

Akola News : अकोल्यातील तिरडीवरुन उठलेल्या तरुणाचे वास्तव आले समोर

अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार उघडकीस आला होता.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील (Akola) पातूर तालुक्यातील विवरा येथील २५ वर्षाच्या युवकाला मृत घोषित करून त्याला अंतिम संस्कारासाठी घेऊन जात असताना हा युवक उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता तर या घटनेची बातमी काल राज्यभरात वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती.

सदर युवकाला पाहण्यासाठी त्याच्या घरासमोर जमलेली गर्दी आणि विचित्र असं वास्तव यामुळे एकच खळबळ उडाली होती. शिवाय हे कसं झालं तो खरचं मृत झाला होता की सर्व बनाव होता. असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये होते त्या सर्व प्रश्नांचा आता उलघडा झाला आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, काल अत्यसंस्कार (Funeral) करायला जाताना एक तरुण चक्क तिरडीवरतीच उठून बसला होता. मात्र हा सर्व प्रकार एका कथित महाराजने स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी बनाव घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा आता झाला असून त्या कथित महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश महाराज गोरले असं त्या मांत्रिकावर रात्री उशिरा चान्नी पोलिसांनी (Channi Police) गुन्हा दाखल केला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या (Patur Taluka) विवरा गावातील प्रशांत मेसरे नामक तरूणाचा मृत्यू झाल्याचे सांगत गावातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

अंत्ययात्रेदरम्यान मी त्याला जिवंत करतो असं म्हणत एका मांत्रिकाने त्याला जिवंत केल्याचा दावा केला यानंतर पोलिसानी (Police) या प्रकरणी प्रशांतच्या कुटुंबियांच्या जबाब नोंदवला आहे. दरम्यान या प्रकरणी आता चान्नी पोलिसानी गणेश महाराज मंत्रिकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय असे प्रकार पुन्हा घडू नयेत आणि अशा स्वयंघोषित मांत्रिकांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali For Diabetes Patient: डायबिटीजच्या रूग्णांनी दिवाळीचा फराळ खावा की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

Pune News: सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडाल तर खबरदार, पुणे महानगरपालिकेकडून नियमावली जारी

अखेर गोकुळचा अध्यादेश निघाला; सरकारच्या 4 संचालकांची नेमणूक|VIDEO

Walking For Weight Loss: एका आठवड्यात १ किलो वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती तास चालावे? जाणून घ्या

Traditional Mangalsutra For Women: महिलांसाठी ट्रेडिशनल मंगळसूत्र डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर दिसतील उठून

SCROLL FOR NEXT