Corona saam tv
महाराष्ट्र

Corona: रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यू वाढले

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. मात्र मृत्यूच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. यामुळे काळजी घ्यावी हाच उपाय आहे. (akola news number of patients decreased but the number of deaths increased)

कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरू लागली आहे. महिनाभरापुर्वी आलेल्‍या कोरोनाच्‍या या लाटेमुळे सर्व अलर्ट झाले होते. बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत होता. आता मात्र कोरोना (Corona) बाधितांची संख्‍या कमी झाली आहे. परंतु, मृत्‍यू होत असल्‍याने कोरोनाची तिसरी लाट गेली असे म्‍हणता येणार नाही. तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर अकोला (Akola) जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. जानेवारी महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मात्र गेल्या पाच दिवसापासून नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोना पासून बरे होणारे प्रमाण वाढले असल्याने अकोलेकरांना दिलासा मिळालाय. त्यामुळे अकोल्यात प्रशासनाने नियमात शिथिलता दिली.

पुन्‍हा तिघांचा मृत्‍यू

अकोल्‍यात 122 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 123 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान 31 जानेवारीला तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर 1 फेब्रुवारीला एकाच्या तर २ फेब्रुवारीला दोघांच्या मृत्यू नोंद झाली. यानंतर आज पुन्‍हा तिघांचा कोरोनामुळे मृत (Corona Death) झाला. त्यामुळे रुग्णसंख्या जरी घटत असली तरी मृत्यू वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ६४४६७

मयत ११६२

डिस्चार्ज-६२२१०

दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१०९५

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT