Akola News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: पोटच्या मुलीवर अतिप्रसंग; नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा

पोटच्या मुलीवर अतिप्रसंग; नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा

जयेश गावंडे

अकोला : बाप- मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या नराधम बापाला सत्र (Court) न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही धक्कादायक घटना (Akola) अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यात घडली होती. (Letest Marathi News)

बाळापुर तालुक्यातल्या उरळ (Police) पोलीस स्टेशन हद्दीतील वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबात बाप-मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी उजेडात आली. दरम्यान या गावात मागील वर्षी 14 ऑगस्ट 2022 रोजी एका 45 वर्षीय बापाने पोटच्याच पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरी लैंगिक अत्याचार (Crime News) केला. हा प्रकार आई, भाऊला सांगितल्यास तुला आणि तुझ्या आई, भाऊ यांना देखील जीवे करून टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या काकूला हा प्रकार सांगितला असता आईला इथे बोलवण्यात आले अन् उरळ पोलीस ठाणे गाठले. अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय बापाविरुद्ध तक्रार दिली आहे.

शिक्षेसोबत दंडही सुनावला

निर्दयी बापाने आपल्याच 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. बापाच्या या अत्यंत क्रूर कृत्याला मुलीने वाचा फोडली. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून नराधाम बापाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात बापाच्या कृत्यावर न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच लाख वीस हजार रुपयांचा दंड सुनावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT