Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Corona Update: अकोल्‍यात आढळले चार रुग्ण; कोरोनाची स्थिती नियंत्रणात

अकोल्‍यात आढळले चार रुग्ण; कोरोनाची स्थिती नियंत्रणात

जयेश गावंडे

अकोला : जिल्ह्यात कोविडची स्थिती नियंत्रणात असताना चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान एकाने कोविडवर (Covid 19) मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Live Marathi News)

चीनमध्‍ये कोरोनाने (Corona News) कहर माजविला आहे. यामुळे देश व राज्‍य अलर्ट झाले आहे. मास्‍क सक्‍ती देखील होवू शकते. दरम्‍यान गत पाच दिवसांत जिल्ह्यात कोविडचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, अचानक चार नवे रुग्ण आढळल्याने अकोलेकरांची (Akola) चिंता वाढली आहे. कोविडचा धोका अजूनही पूर्णतः गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

आठ सक्रिय रुग्ण

प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोविडचे चार रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांमध्ये तीन महिला व एक पुरुष रुग्णाचा समावेश असून हे रुग्ण मूर्तिजापूर आणि महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. दरम्यान एका रुग्णाने कोविडवर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. आठही रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT