Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : आधी मंगळसूत्र चोरलं, नंतर परत देत चोरट्यांनी महिलेला माफी मागितली; नेमकं काय घडलं?

Akola News : महिलेच्या जवळ दुचाकी थांबविता महिलेला पत्ता विचारू लागले. मात्र महिलेला काही समजण्याच्या आत एकाने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून दोन चोरट्यांनी दुचाकीवर पळ काढला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: दुचाकीने येत अंगणात असलेल्या महिलेला पत्ता विचारण्यासाठी थांबले. संधी मिळताच गळ्यातील मंगळसूत्र घेऊन चोरटे पसार झाले. मात्र नंतर चोरलेले मंगळसूत्र परत आणून देत माफी मागितल्याचा प्रकार अकोल्यात घडला आहे. या दोन्ही घटनांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

अकोला शहरातल्या आनंद नगरात हि घटना घडली आहे. या घटनेत अंगणात एक महिला झाडू मारत होती. याचवेळी एका दुचाकीवरून दोघेजण आले. महिलेच्या जवळ दुचाकी थांबविता महिलेला पत्ता विचारू लागले. मात्र महिलेला काही समजण्याच्या आत एकाने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून दोन चोरट्यांनी दुचाकीवर पळ काढला होता. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. 

दोघांना गुजरात, नागपूरमधून अटक 

दरम्यान या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत पोलिसांनी तपास सुरू केला. तपास दरम्यान या दोघांचा शोध लागला असता या दोघांना गुजरात आणि नागपूर येथून अटक करण्यात आली. दीपक परमार आणि राकेश पटानी असं या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले मंगळसूत्र ताब्यात घेतले. 

चोरट्यांना घेऊन महिलेचे घर गाठले 

चोरट्याने ताब्यात घेतल्यानंतर अकोला पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना सोबत घेत तक्रारदार महिलेचे घर गाठलं. यानंतर चोरलेलं मंगळसूत्र महिलेला परत करून माफी मागायला लावली. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ तयार केला. यानंतर हा व्हिडीओ समाज माध्यमावरून व्हायरल करण्यात आला आहे. दरम्यान, अकोला पोलिसांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला गुलाबपाणी लावल्याने काय होते? जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसराला दिलासा

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात मोठे फेरबदल; एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, हे 5 आजार दूर होतील

SCROLL FOR NEXT