Akola News Saam TV
महाराष्ट्र

चिंताजनक : एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीसह ३ तरुण बेपत्ता

बेपत्ता विद्यार्थी दिसून आल्यास तात्काळ ७०२०८२१७८५, ९८५०५२८८८५ या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : एकाच महाविद्यालयामध्ये (College) शिकणारे तीन तरुण आणि एक तरुणी मागील एक ऑगस्टपासून बेपत्ता झाले आहेत. १ ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला जातो म्हणून गेले होते. मात्र, तेव्हापासून ते परतलेच नाहीत. चौघेही अकोला जिल्ह्यातील (Akola) बाळापूर तालुक्यातल्या व्याळा येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत आहेत.

बेपत्ता झालेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तिघांचा तर बुलडाणा जिल्ह्यातील (Buldhana District) खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील तरुणाचा देखील समावेश आहे. तुळशी अनिल ताले वय १८ , राहणार रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला, प्रतीक मनोहर तायडे वय २१ रा.अडगाव बु. ता.तेल्हारा, जि. अकोला, हर्ष विष्णू घाटोळ वय १७ वर्ष पळशी खुर्द ता.खामगाव, जि.बुलढाणा आणि प्रफुल पांडुरंग लंगोटे वय १९, राहणार न्यू भीम नगर, कृषी नगर, अकोला अशी बेपत्ता विद्यार्थ्यांची नावं आहेत.

पाहा व्हिडीओ -

हे चौघे बेपत्ता असल्याची तक्रार बाळापुर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हे चौघेही बाळापुर तालुक्यातील व्याळा येथील मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत

सोमवारपासून घरून कॉलेजमध्ये गेले होते. मात्र, अद्याप ते घरी परतलेले नाहीत. हे चौघेही कुठे दिसून आल्यास तात्काळ अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. ७०२०८२१७८५ आणि ९८५०५२८८८५ या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

SCROLL FOR NEXT