Akola Akot Taluka News
Akola Akot Taluka News Saam TV
महाराष्ट्र

Akola News: जनावरांसाठी चारा आणायला गेला, अचानक वीज कोसळली; वडिलांसमोरच लेकाचा अंत

Satish Daud-Patil

Akola Akot Taluka News

जनावरांना चारा आणण्यासाठी वडिलांसोबत शेतात गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मंगळवारी (ता. १६) दुपारच्या सुमारास घडली. अरहम बेग इकबाल बेग (वय १२ राहणार धारोली) असं मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अकोल्यात (Akola News) विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट होत असल्याने शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच अकोट शहरातील धारोली वेस भागात राहणारा अरहम बेग हा जनावरांना चारा आणण्यासाठी वडिलांसोबत शेतात गेला होता.

त्यावेळी आकाशात वीज चमकत होत्या. अरहम वडिलांपासून काही अंतरावर चारा तोडत असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, वडिलांनी त्याला तातडीने उपचारासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. (Latest Marathi News)

मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या डोळ्यादेखतच वीज पडून मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अकोल्यात अवकाळीमुळे शेतीपिकांचं नुकसान

अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने अकोट, तेल्हारा, बाळापूर व मुर्तीजापूर तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कांदा, भुईमूग, भाजीपाल्यासह लिंबू व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी गहू, ज्वारी, कांदा, तिळ ही पिके पूर्णत: मातीत गेली आहे. सरकारने भरपाई जाहीर करावी, अशी मागणी बळीराजा करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Kale : कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; गाझातील बॉम्ब हल्ल्यात झाले होते शहीद

Kanhaiya kumar: कन्हैया कुमारवर हल्ला; प्रचारादरम्यान पुष्पहार घालताना कानशिलात लगावली

Mahayuti Sabha: मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं? शिवाजी पार्कात देवेंद्र फडणवीसांनी 'इंडिया' आघाडीकडे मागितला हिशोब

Today's Marathi News Live: निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे, ना की धर्म, जातीपातीवर; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडूंनी सुनावलं

BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT