Akola Mahapalila | अकोला महापालिका  SaamTvNews
महाराष्ट्र

अकोला महापालिका निवडणूक; प्रारूप प्रभाग रचना जाहीर

वर्तमानस्थितीत अकोला महापालिकेत 80 सदस्य असून राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार त्यामध्ये आणखी 11 सदस्यांची वाढ करण्यात आली आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोला (Akola) महापालिकेच्या निवडणूकीचा बिगुल वाजला असून प्रभागांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेतील (Akola Mahapalika) सभागृहात आज अकोल्यात 30 प्रभाग निश्चित करून प्रभागांचे नकाशे नागरिकांसाठी लावण्यात आले आहेत. यावेळी नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात हरकती, सूचना व आक्षेप नोंदविण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

हे देखील पहा :

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मनपाची (Muncipal Corporation) प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची लगबग सुरु झाली आहे. ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने फेब्रुवारी महिन्यात पार पडणारी महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्याचे समोर आले आहे. राज्य निवडणूक (Election-Commission) आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो नोव्हेंबर महिन्यात निवडणूक आयोगाकडे सादर केला होता.

वर्तमानस्थितीत अकोला (Akola) महापालिकेत 80 सदस्य असून राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार त्यामध्ये आणखी 11 सदस्यांची वाढ करण्यात आली आहे. 91 सदस्यांची संख्या लक्षात घेता प्रभाग रचनेदरम्यान प्रभागांचे (Ward) क्षेत्रफळ कमी करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्याबद्दल अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची प्रारुप अधिसूचना जारी करीत त्यावर आक्षेप, हरकती व सूचना नोंदविण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT