अकोल्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला; पूर्णा नदीला मोठा पूर! जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला; पूर्णा नदीला मोठा पूर!

अकोला जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अकोला-अकोट महामार्ग बंद झाला आहे. गांधीग्राम येथील ब्रिटिश कालीन पुलावरून पाणी वाहत असल्याने अकोला जिल्ह्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोला, अमरावती जिल्ह्यातील काही भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला असून अकोला जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अकोला-अकोट महामार्ग बंद झाला आहे. गांधीग्राम येथील ब्रिटिश कालीन पुलावरून पाणी वाहत असल्याने अकोला जिल्ह्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

हे देखील पहा :

अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये अमरावती, अकोला जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी, पूर्णा नदीला मोठा पूर आला असून अकोला जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.

यामध्ये अकोट-अकोला महामार्गावरील पूर्णा नदीवर असलेल्या पुलाच्या पाच फूट वरून पाणी वाहत आहे. त्यामुळे दळणवळण पूर्णतः थांबले आहे. तर, बैतुल कडे जाणारा मार्गही बंद झालाय. दरम्यान, या पुलावरून प्रवास करणे टाळावे व परिसरातील गावकऱ्यांनी सावधानता बाळगावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. तर, पूर्णा नदीचे पाणी अनेकांच्या शेतात गेल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanyachya Daliche Pani: १५ दिवस चण्याच्या डाळीचे पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

80s च्या ट्रेंडने सोशल मीडियावर क्रेझ; आमिर खानपासून कियारा आडवाणीपर्यंत सेलिब्रिटींचा भन्नाट रेट्रो लूक

Apple iPhone Duo: Apple चा पहिला फोल्डेबल iPhone Duo लॉन्च; 2TB स्टोरेजसह किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, माजी मंत्री तानाजी सावंत यांची शासनाकडे मागणी

Milk Cake Recipe: गोड आणि हेल्दी खाण्याची इच्छा होते? घरी बनवा मऊ आणि दाणेदार मिल्क केक; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT