Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

Akola News : अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना सडलेली फळं, नासलेली अंडी आणि निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचा वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे. सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी पुरावे सादर करत अधिष्ठातांकडे तक्रार दाखल केली आहे.

Alisha Khedekar

अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना सडलेलं आणि निकृष्ट दर्जाचं जेवण

वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांनी अधिष्ठातांना पुरावे सादर केले

अधिष्ठातांना दाखवलं जाणारं जेवण चविष्ट, पण रुग्णांना दिलं जाणारं निकृष्ट

वंचित आघाडीने चौकशी आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या भोजनाचा दर्जा निकृष्ट असल्याचा समोर आलं आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी याची तक्रार केली आहे. रुग्णालयातील काही वॉर्डामध्ये रूग्णांना सडलेली फळे, खराब झालेले अंडे वाटप करण्यात आल्याचा पुरावाच त्यांनी 'जीएमसी' चे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांच्या समोर सादर केला. याकडे 'रुग्णालय' प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

काही वॉर्डामध्ये रूग्णांना सडलेली फळे, सडलेले अंडे आणि निकृष्ट दर्जाच्या भाजी, पोळी देण्यात येत आहेत. पोळ्यासाठी रेशनचा हलक्या दर्जाचा गहू वापराला जात आहे, तर भाजीमध्ये पाणीच जास्तच राहत आहे. बेचव अशा भाज्या रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांना दिली जात असल्याचा वंचितचे पराग गवई यांनी केला आहे.

दरम्यान, शासकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १४ आणि सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटलमधील सारीचा जळालेल्या वार्डात सडलेले सफरचंद आणि नासलेली अंडी रुग्णांना वाटप केल्याचा हा आरोप होता. याची सखोल चौकशी करण्यात यावी. दुसरीकडे रुग्णांना चांगला नाश्ता द्यावा, रोज तयार होणारी भाजी ही एकाच प्रकारची असून, त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट राहत आहे. पोळीच अर्थातच चपातीचे पीठ हे मैदा मिश्रित आहे. जे रूग्णांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे.

यापुढे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना चहा, नाश्ता हा सकाळी साडे ८ वाजेपर्यत देणे अपेक्षित असले पाहिजे. मात्र, हा नाश्ता १० वाजता दिला जात असल्याचा आरोप देखील गवई यांनी केला आहे. दरम्यान, अधीपरिचारिका अश्वीणी मुनेश्वर यांची मेसमध्ये नियुक्ती कशासाठी केलेली आहे? त्यांची तिथे नियुक्ती कुठल्या आदेशाने केली आहे, याची देखील चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी देखील यादरम्यान करण्यात आली.

अधिष्ठातांना दाखवलं जातं चविष्ट जेवण, मात्र रुग्णांना भलतंचं

अकोल्याच्या शासकीय रूग्णालयामध्ये रूग्णांना व नातेवाइकांना दैनंदिन दिल्या जाणाऱ्या चहा, नाश्ता व भोजनाबाबत अनेकदा तकारी रूग्णांच्या नातेवाइकांनी केल्या. परंतु, त्यावर उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही आहे. जीएमसी'चे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांच्या समोर दररोज सादर होणारं जेवणाचं ताट उत्तम दर्जाज राहत, अर्थातच चविष्ट जेवण दाखवलं जातं. मात्र, रुग्णालयातील रुग्णांना भलतंच म्हणजेच निकृष्ट दर्जाचा असलेला आहार वाटप केला जात, असा आरोप यावेळी वंचितने केला आहे. यापुढे रुग्णालयात असाच प्रकार सुरु राहिला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिलाय. तसेच रूग्णांना पौष्टीक आहार मिळावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT