अकोल्यात पोळा सणाला गालबोट; तिघे गेले वाहून जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात पोळा सणाला गालबोट; तिघे गेले वाहून

पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत गेलेल्या आगर येथील युवकाचा गाव तलावात पडून वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला - पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत गेलेल्या आगर येथील युवकाचा गाव तलावात पडून वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. तर काटेपूर्णा नदीमध्ये ही दोन जण बैल धुण्यासाठी गेलेले असताना तेही नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आगर येथील मनोज खाडे हा युवक गाव तलावात वाहून गेल्यानंतर त्याला नागरिकांनी बाहेर काढले. मात्र, इतर दोघांचा अजूनही तपास सुरू आहे.सागर गोपाल कावरे (21) आणि गोपाल महादेव कांबे (19) अशी या दोघांची नवे आहेत.

हे देखील पहा-

सर्वत्र पोळा उत्सव साजरा होत असताना, या दिवशी बैलांची पूजा करण्याची प्रथा आहे. बैल धुण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे जवळच्या नदीवर जात असतात. नदीवर बैलांना धुतल्यानंतर ते घरी आणून त्याची पूजा करीत असतात. मात्र, बराच वेळा नदीला पाणी जास्त असल्याने अनेक युवक किंवा नागरिक हे नदीच्या पात्रामध्ये वाहून जात असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही घडलेल्या आहेत.

अकोला तालुका आणि बार्शीटाकळी तालुक्यातील असे तीन जण नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. आगर येथील मनोज खाडे हा बैल धुण्यासाठी गाव तलावात गेला असता त्याचा पाय घसरून तो तलावात बुड्याल्याची घडना घडली. ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी त्याला बाहेर काढले.

तर बार्शीटाकळी तालुक्यातील कानशिवणी येथील दोन युवक पार्डी येथील काटेपुर्णा व पिंजर्डा नदीच्या संगमावर बैल धुत असतांना काटेपुर्णा नदीत वाहून गेले. सागर गोपाल कावरे आणि गोपाल महादेव कांबे असे दोघांची नावे आहेत. पिंजर पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली आहे. या दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT