Akola Bribe Case News AI
महाराष्ट्र

Akola : अकोल्यात खळबळ! जिल्हाधिकाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Akola Bribe Case News : अकोल्यात खाणी सुरू ठेवण्यासाठी १५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर BNS कायद्यानुसार गुन्हा दाखल. ऑडिओ क्लिप्समुळे प्रकरणाला वेग.

Alisha Khedekar

  • अकोल्यात लाचखोरी प्रकरण उघडकीस

  • अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर गंभीर आरोप

  • खाणी सुरू ठेवण्यासाठी १५ हजारांची मागणी

  • ऑडिओ क्लिप्स पुरावे म्हणून सादर

  • BNS कायद्यानुसार गुन्हा दाखल

अक्षय गवळी, अकोला

Akola District Collector Taken Bribe News लाच घेणं आणि लाच देणं हा कायद्याने गुन्हा असला तरी, कामं पूर्ण देण्याच्या आश्वासनाखाली आजही लाच घेतली जाते. अशीच घटना अकोल्यात घडली आहे. एका अप्पर अधिकाऱ्याने खाणी सुरु ठेवण्यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रमोद गायकवाड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अधिकाऱ्याविरोधात BNS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या विरोधात पुरावे म्हणून खान मालकांनी ऑडिओ क्लिप्स सादर केले. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गौण खनिजाच्या जवळपास ७० खाणी आहेत. या खाणींमध्ये दगड, गिट्टी, क्रशर आणि मुरूम खाणींचा समावेश आहे. गिट्टी आणि दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांची मागणी, तसेच धमकी दिल्याचा आरोप खाण मालकांनी केला होता.

यासंदर्भात पैशाची मागणी केलेल्या खानमालकांनी अकोल्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केली. यासंदर्भात ऑडिओ क्लिप्स त्यांनी पुरावे म्हणून दिले. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खानमालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर ९ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

संपूर्ण चौकशीनंतर या प्रकरणात अप.नं. 270/2026 कलम 308(2), 351 (1), BNS सह कलम 7 PCA नुसार गुन्हा दाखल केलाय. १५ हजार रुपये खंडणी मागितली, पैसे न मिळाल्यास तुमचे व्यवसाय बंद पाडू, अशा धमकी प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अशा लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT