Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : जामिनावर बाहेर आला अन् इमारतीतील इंजिनीअरशी बिनसलं; रागात धारदार शस्त्राने वार करत संपवलं

Akola Crime News : अकोल्यात एका 60 वर्षीय माजी उपअभियातांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. आरोपी फरार झाला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही

Akola Crime : अकोल्यात एका सेवानिवृत्त 60 वर्षीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियातांची हत्या झाल्याची घटना घडली आहे.. अकोल्यातील रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलंय. संजय कौसल असं हत्या करण्यात आलेल्या माजी अभियातांचं नाव आहे. तर महेंद्र विश्वासराव पवार असं मारेकरी व्यक्तीच नाव आहे. रणपिसे नगरातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करीत त्यांना जागीच ठार केले. विशेष म्हणजे संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलीसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान जुन्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याचे बोलले जाते.

याआधीही त्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला होता. तसेच गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. काही दिवसापूर्वीच मारेकरी पवार हा न्यायालयीन जामिनावर बाहेर आला होता.

दरम्यान, अकोल्यातील रणपिसे नगरातल्या मुरलीधर टॉवर येथे हत्याकांड घडले. विशेष म्हणजे मारेकरी आणि मृतक हे दोघेही मुरलीधर टॉवर्स येथील रहिवासी आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. आरोपीच्या शोधात पोलिसांचे 2 पथक रवाना झाल्यात. संजय कौसल यांची हत्या केल्यानंतर आरोपी महेंद्र फरार झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच भाजपचे आमदार रणधीर सावरकर घटनास्थळी पोहोचले आहेत. महेंद्रने लोखंडी टिकासने वार करीत संजय कौसल यांना जागीच ठार केलं. रणपिसे नगरातील या घटनेने परिसरात भीती पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT