Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News: तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पतीची केली हत्या; ४० वर्षीय महिलेचे धक्कादायक कृत्य

Akola News: तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पतीची केली हत्या; ४० वर्षीय महिलेचे धक्कादायक कृत्य

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 
अकोला
: एखाद्या टीव्ही सिरीयलमध्ये दाखवितात तसा धक्कादायक प्रकार अकोल्यात घडल्याचे समोर (Akola) आले आहे. या प्रकारात एका ४० वर्षीय विवाहितेने २४ वर्षीय तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (Crime News) ओढले. यानंतर प्रियकर बनविलेल्या तरुणाला लावून आपल्या पतीची हत्या केली.  (Latest Marathi News)

अकोला जिल्ह्यातल्या ग्राम उगवा गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात ४० वर्षीय महिलेने एका २४ वर्षीय तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्याच्याजवळ आपल्या सर्व सुख-दुःख सांगताना आपलं दुःख त्याच्यासमोर असं ठेवलं की त्या तरुणाला समोर काय होईल याचा अंदाजही आला नाही. महिलेच्या प्रेमात बुडालेल्या या तरुणाला महिलेने हाताशी धरत त्याच्याच मदतीनं आपल्या ५० वर्षीय पतीची हत्या केली.  

१८ दिवसानंतर झाला उलगडा  

दरम्यान पतीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह उगवा शेतशिवारातील गवतामध्ये फेकून देण्यात आला. तब्बल १८ दिवसांनंतर हा मृतदेह समोर आला. अकोला पोलिसांनी चार दिवसांत या संपूर्ण घटनेचा गुह्याचा उलगडा केला आहे. या हत्येप्रकरणी आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दाताच्या समस्यांवर तगडा उपाय! मीठ - पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांची सूज होईल कमी, असा करा वापर

Maharashtra News Live Update: पेरणीची घाई न करण्याचे निर्देश कृषी विभागातर्फे देण्यात आले असताना शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू

Skin Fasting: एक दिवस करा फेस फास्टिंग, चेहरा होईल नॅचरली ग्लो, सगळ्याच्या नजरा तुमच्यावरच खिळतील

ठाणेकरांवर पाणीसंकट ? अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Jalgaon Tourism: माथेरान-महाबळेश्वरही पडेलं फिकं! जळगावपासून फक्त 284 किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन

SCROLL FOR NEXT