Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News: मुलावर अनैसर्गिक अत्याचार; बोरं देण्याचे आमिष दाखवत 57 वर्षीय नराधमाचे कृत्‍य

मुलावर अनैसर्गिक अत्याचार; बोरं देण्याचे आमिष दाखवत 57 वर्षीय नराधमाचे कृत्‍य

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठलगतच्या रेल्वेगेट परिसरात खेळत असलेल्या एका ११ वर्षीय मुलावर नराधमाने अनैसर्गिक (Crime News) अत्‍याचार केला. (Live Marathi News)

आजूबाजूच्‍या परिसरात कोणीच नसल्याची संधी साधत नराधमाने मुलाला बोर देण्याचे आमिष दाखविले. मुलगाही बोरं मिळतात; म्हणून सोबत यायला तयार झाला. या नराधम आरोपीने त्याला काटेरी झाडाझुडूपांमध्ये नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणात अकोला सिव्हिल लाइन पोलिसांनी गजानन नामक ५७ वर्षीय आरोपीस अटक केली आहे.

आरोपीस पोलिस कोठडी

मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या झाडाची बोरं तोडून देण्याचे आमिष दाखविले. यानंतर गजानन नामक ५७ वर्षीय नराधमाने ११ वर्षीय मुलाला लगतच्या काटेरी झुडूपांत नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीला अटक करत आरोपींविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'गोकुळ'ची निवडणूक बिनविरोध नाहीच? बिनविरोधला सतेज पाटलांचाही विरोध

Burning Feet: पायाचे तळवे अचानक गरम होतात, 'या' ३ आजारांचे असू शकते लक्षण

Maharashtra News Live Update: ठाणे शहरातील चिंतामणी चौकातील एका दुकानाला भीषण आग

राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील दोन दिग्गज महिला नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

विधान परिषद निवडणुकीआधी भाजपची नवी रणनीती; बावनकुळे,मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT