Akola Crime News: Saam TV
महाराष्ट्र

Akola Crime News: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Akola Crime News: अकोला जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केला.

जयेश गावंडे

Akola Crime News: अकोला जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून ३५ वर्षीय व्यक्तीचा खून केला आहे. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील बोरव्हा गावात ही घटना घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  (Breaking Marathi News)

भुरेलाल लालसिंग चोंगळ असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून अंतरसिंग भावरा मोरी असं मारेकरी (Crime News) म्हणजे खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पत्नी बरोबर अनैतिक संबध आहेत. या संशयावरून अंतरसिंगनं देशी कट्टयातून भुरेलालच्या छातीवर दोन गोळ्या झाडून हत्या केली.

काय आहे संपूर्ण घटना?

अकोला (Akola News) जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातल्या बोरव्हा गावात एका व्यक्तीवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या माहितीनंतर लागलीच घटनास्थळी हिवरखेड पोलिसांनी भेट दिली.

पोलिसांनी (Police) घटनेचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासण्यासाठी पाठवून दिला होता. या दरम्यान, भुरेलाल लालसिंग चोंगळ असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याच समोर आलं. या घटनेचा अधिक तपास केला असता, पोलिसांना गावातीलच अंतरसिंग नावाच्या व्यक्तीने भुरेलालची हत्या केल्या असल्याचं उघड झालं.  (Latest Marathi News)

या घटनेसंदर्भात हिवरखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरी अंतरसिंग हा घटनेपासून फरार आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT