akola, city kotwali police station akola, youth saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News : कमला नेहरू नगरात युवकाचा खून

अकोला शहरात घडणाऱ्या घटनांवर अंकुश कसा लागेल याचे मंथन पोलिस प्रशासनाला नक्की करावे लागेल यात शंकाच नाही.

जयेश गावंडे

Akola City Kotwali Police Station News : अकोला (akola) शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन (city kotwali police station) हद्दीत येत असलेल्या पोलीस मुख्यालया समोरील कमला नेहरू नगर येथे किरकोळ कारणाने वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात होऊन एका 16 वर्षीय युवकाचा (youth) धारधार चाकूने गळ्यावर, डोक्यावर वार करून खून करण्यात आला. (Maharashtra News)

घटनास्थळावरुन आणि पाेलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार रोहन रणधीर सोळंके (वय 16, राहणार कमला नेहरू नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्येवर चाकूने मानेवर, डोक्यावर सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.

दरम्यान पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. नेमकी ही हत्या का झाली ? नेमकं हत्येमागील कारण काय? किती मारेकरी होते? हे अनुत्तरीय प्रश्न असून याचे उत्तर संशयित आरोपींना पकडल्या नंतरच काळू शकेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Live News Update: अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडले, शोध सुरू

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

SCROLL FOR NEXT