Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

संतापजनक! मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर बलात्कार, मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

अकोल्यातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime News : अकोल्यातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम मित्रानेच मित्राच्या बायकोवर बलात्कार केला आहे. पीडितेचा पती घरी नसताना आरोपीने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर अश्लील व्हिडीओचे भय दाखवून ब्लॅकमेलिंग करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, 31 वर्षीय पीडित महिला ही तिच्या पती व लहान मुलासोबत रामदास पेठ पोलिस स्टेशन परिसरात (Akola) राहते. दरम्यान, पीडितेच्या घरी खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील रहिवासी शेख रिजवान शेख अहमद याचे येणे-जाणे सुरू राहायचे. पीडितेचा पती कामानिमित्त घराबाहेर गेल्यावर ती घरात एकटी राहत असल्याचे आरोपी शेख रिजवान शेख अहमद याच्या लक्षात आले.

3 जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेख रिजवान याने पीडितेच्या घरात प्रवेश करत पीडितेला मारहाण केली, तसेच पीडितेला धमकी देत, तिच्यावर अत्याचार केला. यानंतर, तीन वेळा आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, 4 डिसेंबर रोजी आरोपी शेख रिजवान याने अमरावती येथील मुजफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या इमरान खान रमजान खान नामक मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.

तसे न केल्यास पीडितेचे अश्लील व्हिडीओ, तसेच छायाचित्र काढून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत, पीडितेवर दोघांनी अत्याचार केला. दोघांच्या अत्याचाराला कंटाळून पीडित महिलेने पतीसोबत रामदासपेठ पोलिस (Police) ठाणे गाठले व आरोपीविरुद्ध तक्रार दिली. यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध कलम 376 (२), (एन), 323 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT