Akola News : अकोला जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका नराधमाने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर बलात्कार केला आहे. बुधवारी (५ एप्रिल) रात्रीच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.
गुलाम रसूल शेख मतीन (वय २६ वर्ष राहणार सज्जाद हुसेन प्लॉट भगतवाडी, अकोला) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अंध महिला आणि तिचा पती अमरावती जिल्ह्यातील परतवाडा राहणारे असून त्यांना पाच वर्षाची मुलगी आहे. तर ती मुलगी लहानपणापासूनच अकोला (Akola News) जिल्ह्यातील वाडेगाव (दिग्रस) इथे आजीकडे राहायची.
दरम्यान, मुलीच्या भेटीसाठी दोघेही ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता परतवाडा बस स्थानकावरून अकोल्यात येण्यासाठी निघाले होते. अकोल्यात पोहचण्यास त्यांना रात्र झाली. साधारण ८ वाजेच्या सुमारास ते बसमधून खाली उतरले. त्यांना वाडेगाव येथे जाण्यासाठी जुन्या बसस्थानकावर जायचं होतं. मात्र, रात्रीची वेळ असल्यामुळे आणि त्यातच पाऊस सुरू असल्याने त्यांना तिथे जाणे शक्य नव्हतं.
त्यामुळे रेल्वे स्थानकावरच रात्रीचा मुक्काम करायचं दोघांचं ठरलं. त्यावेळी पत्ता विचारण्यासाठी मदतीचा हात मागणाऱ्या एका व्यक्तीनेच दोघांनाही अकोट फ़ैल परिसरात नेलं. या नराधमाने पती आणि पत्नी दोघेही अंध असल्याचा फायदा घेत महिलेवर (Crime News) अत्याचार केला.
तुझा आणि तुझ्या पतीचा चाकू भोकसून हत्या करून टाकणार, अशी धमकी देत तब्बल तीन वेळा तिच्यावर जबरी अत्याचार केला. सुरुवातीला या सर्व गोष्टींना पतीने विरोध केला असता पतीचा गळा दाबून त्याला साईडला बसून ठेवले. आणि तिला उचलून नेत परत तिच्यावर काही अंतरावर अत्याचार केला. दरम्यान पती डोळ्यांना अंध असल्यामुळे तो या गोष्टींना विरोध करू शकला नाही.
दरम्यान, या घटनेनंतर नराधम फरार झाला. त्यानंतर या दाम्पत्याने तेथून रेल्वेस्थानक गाठत पोलिसांना (Police) याबाबतची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य पाहता सिव्हिल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी बस स्थानक परिसर तसेच जुन्या बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. सीसीटीव्हीच्या आधारावर त्याची ओळख पटली आणि लगेच त्याला अटक केली. आज या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस त्याची कोठडीची मागणी करणार आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.