Akola News Saam tv
महाराष्ट्र

Crime : मंगळसूत्र चोरीच्या घटनेने तिच्या आयुष्याचं मंगळसूत्र हिरावलं; चोरट्यांचा पाठलाग करणे पतीच्या जीवावर बेतला

Akola News : अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म चारवर रेल्वेतून गावंडे दाम्पत्य खाली उतरले. एका चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला चोरट्याचा महिलेचा पतीने पाठलाग केला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: भररस्त्यावर मंगळसूत्र, सोन्याच्या चैन तोडून नेण्याच्या घटना घडत असतात. अशीच घटना अकोल्यात समोर आली असून पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्यासाठी जीवघेणा ठरला. पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्याने बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पत्नीच्या आयुष्याचे मंगळसूत्रच हिरावून घेतले आहे. 

अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात सदरची घटना घडली. अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म चारवर रेल्वेतून गावंडे दाम्पत्य खाली उतरले. याच वेळी एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मंगळसूत्र तोडून पडणाऱ्या चोरट्याचा महिलेचा पती हेमंत गावंडे याने पाठलाग केला. जवळपास आठशे ते नऊशे मीटर पर्यंत पाठलाग सुरुचं होता. अखेर त्याच्या तावडीत मंगळसूत्र चोरटा आला. 

मिळेल त्या वस्तूने केली मारहाण 

मात्र, या चोरट्याने हातात येईल, त्या वस्तूने हेमंत यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत गंभीर दुखापत केली. घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. जखमी झालेल्या हेमंत याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेचा थरार हेमंतच्या पत्नीने सांगताना मंगळसूत्र न्यायचं असतं, पण नवऱ्याला कशाला मारलं? असा सवाल तिने केला.

चोरटा पोलिसांच्या ताब्यात 

सदरच्या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला. आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी मिळवले. यानंतर अवघ्या २४ तासात आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. परमार असं आरोपीचं नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे.

प्लेटफार्मवर CCTV केमेरा नाही?
अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर एकत्रित ६ प्लेटफार्म आहेत. त्यापैकी १, २ आणि ३ या प्लेटफार्म क्रमांकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र ४, ५ आणि ६ प्लेटफार्मवर अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती समोर आली आहे. पहिले तीन प्लेटफार्म 'मध्य रेल्वे' अंतर्गत येतात. तर उर्वरित ४, ५ आणि ६ प्लेटफार्म हे दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या अंतर्गत येतात. चोरीची घटना रेल्वे स्थानकाच्या चौथ्या प्लेटफार्म घडली असून तिथं सीसीटीव्ही नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT