Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola Crime : डॉक्टर असल्याची बतावणी करून मुलीला वरच्या मजल्यावर घेऊन गेला, अन्.., अकोल्यातील संतापजनक घटना

एका रुग्णालयात तोतया डॉक्टर म्हणून वावरत असलेल्या एका युवकाने अल्पवयीन मुलीला अत्याचार केला आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका रुग्णालयात तोतया डॉक्टर म्हणून वावरत असलेल्या एका युवकाने अल्पवयीन मुलीला अत्याचार केला आहे. तुझ्या वडिलांसाठी औषधे देतो, अशा भूलथापा देऊन आरोपीने मुलीला रुग्णालय परिसरातील एका निर्जनस्थळी नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार केला. (Latest Marathi News)

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी (Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक सुद्धा केली आहे. प्रकाश वानखडे असं या तोतया डॉक्टराचं नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने आरोपीला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या घटनेमुळे सर्वोपचार रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. अकोल्यातील (Akola) सर्वोपचार रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. रुग्णालयात बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे राहणारा प्रकाश प्रल्हाद वानखडे हा तोतया डॉक्टर म्हणून अनेक दिवसांपासून वावरत होता.

पीडित मुलीचे वडील आजारी असल्याने, सर्वोपचार रुग्णालयात भरती झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी मुलगी सोबत आली होती. आरोपीने मुलीला डॉक्टर असल्याची बतावणी केली आणि तो मुलीजवळ गेला आणि मुलीला तुझ्या वडिलांना औषधे देतो, असे म्हणून तिला वरच्या मजल्यावर घेऊन गेला.

तेथे त्याने मुलीच्या हातावर मारले आणि काहीतरी गुंगीसारखा पदार्थ दिला. त्यानंतर मुलीला काही कळण्याच्या आत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार (Crime News) केला. मुलीने घरी गेल्यानंतर तिच्या आईला ही घटना सांगितली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी आरोपी प्रकाश वानखडे याच्याविरुद्ध भादवि कलम ३७६, ३७७, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT