Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : कापड दुकानात चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात; अकोल्यात झाली होती चोरी

Akola News : अकोल्यातल्या सिव्हिल लाईन चौकात असलेले तायबा शोरूम चोरट्यानी फोडले होते. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला होता.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यात कपड्यांच्या दुकानामधून हजारोंचा माल लंपास करण्यात आल्याची घटना घडली होती. हा माळ चोरी करणारे चोरटे अकोला पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. लातूर जिल्ह्यातील हे चोरटे असून त्यांना अकोल्यातील सिव्हिल लाईन चौकातील नामाकिंत 'तायबा' शोरूम'मध्ये झालेल्या चोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. 

अकोल्यातल्या (Akola) सिव्हिल लाईन चौकात असलेले तायबा शोरूम चोरट्यानी फोडले होते. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला होता. चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. यात पाच ते सहा चोरटे कपड्यांच्या शोरूमचे शटर वाकवून आत प्रवेश करून शर्ट, टिशर्ट आणि पॅंटसह गल्ल्यातील ४० ते ५० हजार रुपयांवर हात साफ़ केला होता. (Crime News) या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केला होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी (Police) तपास सुरु केल्यानंतर चोरटे लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मोहम्मद राशीद उर्फ गब्बरू मोहम्मद मुशाहीद, मोहम्मद सलमान मोहम्मद शोकीन, मोहम्मद नदिम मोहम्मद बुदुखॉ, मोहम्मद नदिम मोहम्मद कल्लु या चौघांना अटक केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT