Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : आधी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल; अकोल्यातील तरुणासोबत घडलं तरी काय?

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणाने तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime News : अकोल्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणाने तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरता एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी युवकावर उरळ पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.

अकोल्यातील (Akola) या प्रेमीयुगुलाने उरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान युवकाचा मृ्त्यू झाला आहे. अतुल संजय वायधने असे मृतक युवकाचे नाव आहे. अतुलच्या आत्महत्येनंतर त्याच्या भावाने पोलीस स्टेशनमधील पीएसआयच्या दबावामुळे भावाने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

नेमकं काय घडलं ?

सांगवी खुर्द येथील अतुल संजय वायधने याचे उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या कुटुंबाला समजली. त्यामुळे मुलीवर दबाव आणून कुटुंबीयांना अतुल याच्याविरुद्ध उरळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी (Police) अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

दरम्यान, या दोघांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात अतुल वायधनेचा रुग्णालयात मृत्यू झाला. अतुलच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अतुलचं घर असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT