Akola Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Akola Crime News : नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अकोल्यातील मन हेलावणारी घटना

Crime News : काल शाळेत झालेल्या किरकोळ कारणांवरून अल्तमेशला शाळेतील दोन महिला शिक्षकांनी बेदम मारहाण केली. इतकच नव्हे तर त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असं विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हटलंय.

Ruchika Jadhav

अक्षय गवळी

Akola News :

अकोल्यातून काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. दोन शालेय शिक्षकांकडून मारहाण आणि मानसिक जाच होत असल्याने या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

अल्तमेश बेग इमराण बेग असं आत्महत्या करणाऱ्या शालेय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो ज्या शाळेत शिकत होता तेथे त्याला मोठ्याप्रमाणावर मानसीक त्रास होता. दोन शिक्षक त्याला सतत मारहाण करायचे आणि मानसीक त्रास द्यायचे. या त्रासाला कंटाळून त्याने हा निर्णय घेतल्याचं पालकांनी म्हटलंय.

दरम्यान, अल्तमेश अकोला शहरातील खदान परिसरातील रहिवासी होता. त्याच परिसरातील गुरुनानक विद्यालयात तो शिक्षण घेत होता. या वर्षी तो ९ वीच्या वर्गात शिकत होता. काल शाळेत झालेल्या किरकोळ कारणांवरून अल्तमेशला शाळेतील दोन महिला शिक्षकांनी बेदम मारहाण केली. इतकच नव्हे तर त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असं विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हटलंय.

घडलेल्या प्रकारानंतर सायंकाळी अल्तमेश घरी परतला आणि शाळेतील घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. तेव्हा आई-वडिलांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर सायंकाळी राहत्या घरातील वरच्या खोलीमध्ये तो अभ्यासासाठी जात असल्याचं सांगून गेला.

रात्री बराच वेळ झाला तो खाली जेवणासाठी नं आल्यानं आई त्याच्याकडे गेली. पण त्यांना आपला मुलगा फासावर लटकलेला दिसला. या प्रकरणी खदान पोलिसांनी आत्महत्याप्रकरणी नोंद केली आहे. तसेच गुरुनानक शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जाणार असल्याचे खदान पोलिसांनी म्हटलं आहे.

मात्र पोलिसांनी यावर कॅमेरासमोर बोलायला स्पष्ट नकार दिलाय. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गांभिर्यानं दखल घेऊन संबंधित शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मृत अल्तमेशच्या नातेवाईकांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: सामान्यांना धक्काबुक्की, सेलिब्रिटींना विशेष वागणूक; लालबागचा राजा मंडळावर टीकेची झोड

Sperm Quality: स्पर्म क्वालिटी वाढवण्यासाठी खा 'या' गोष्टी

Actress : त्याने स्पर्श केला अन्... प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन, स्वत: सांगितली आपबिती

Cancer Vaccine: जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खूशखबर

Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

SCROLL FOR NEXT