Crime Crime
महाराष्ट्र

Akola : अकोल्यात थरार... चुलत भावांचं जोरदार वाजलं, कुऱ्हाड अन् दगड, काठीणने मारहाण, एकाचा मृत्यू

Akola News : अकोल्यातून थराराक घटना समोर आली आहे. चुलत भावांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. या मारहाणीत एका तरूणाचा मृत्यू झालाय. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

Akola Crime News : अकोल्यात कौटुंबिक वादामधून १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातल्या शिरसो गावात पारधी बेड्यावर जुन्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. चुलत भावाचे कुटुंब आपसात भिडले. कुऱ्हाड, काठीने एकमेकांना मारहाण करण्यात आल्याचं समोर आलेय. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या धक्कादायक घटनेत एकाचा मृत्यू झालाय. तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत.

अकोल्यात कौटुंबिक वादात तरूणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या डोक्यात कुराडीचा वार लागल्याने गंभीर जखमी झाला अन् जागेवरच प्राण सोडले. मृत तरूणाचे वडील-आई आणि भाऊ या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे.

मृत तरूणाचे नाव सुरज भोसले असल्याचे समजतेय. त्याचे आई-वडील गंभीर जखमी आहेत. अगदी दोन कुटुंबात कुऱ्हाड आणि लाठी काठीने मारहाण झाली. या वादाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा संपूर्ण वाद इतका विकोपाला गेला की थेट हत्येपर्यंत पोहोचला. या संपूर्ण प्रकरणात मुर्तीजापुर पोलीस अधिक तपास करत आहेत.

या संपूर्ण घटनेत तब्बल आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही आरोपींमध्येही काहीजण जखमी आहेत. एकाच कुटुंबातील चुलत भावांमध्ये हा संपूर्ण वाद होता. हा वाद फक्त इतका विकोपाला गेलाय की थेट दोन्ही कुटुंब एकमेकांसमोर भिडले. एकमेकांवर कुऱ्हाडी, दगड आणि काठीने हल्ला करण्यात आला. अगदी हा मोठा वाद होता या वादाचे संपूर्ण व्हिडिओ समोर आलेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात चार लोकांना ताब्यात घेतल आहे. तसेच यापुढे कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता म्हणून गावात आणि शासकीय रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सद्य गावात शांतता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : खरेदीदारांचे टेन्शन वाढणार; ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठा बदल; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

पुस्तकांच्या नावाखाली पालकांना कोट्यवधींचा गंडा; 'साम' इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: रायगड शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक फेरबदल

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता येण्यास उशिर का? कितीने वाढणार पगार? वाचा सविस्तर

World Homeopathy Day 2026: होमिओपॅथीची औषधं घेताना कोणती काळजी घ्यावी? वाचा डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT