FAKE GODMAN EXPOSED IN AKOLA: SUPERSTITION RACKET SPARKS OUTRAGE Saam tv
महाराष्ट्र

Akola : "तुला मुलं होईल पण मला..." आणखी एका भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल

Akola News : अकोल्यातील पोही गावात भोंदू बाबाचा अंधश्रद्धेचा प्रकार उघड. व्हायरल व्हिडिओनंतर गावकऱ्यांची कारवाईची मागणी. पोलिसांकडे तक्रार दाखल.

Alisha Khedekar

  • अकोल्यात भोंदू बाबाचा प्रकार उघड

  • ‘सवारी’च्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप

  • भक्तांकडून पैसे घेतल्याचा दावा

  • गावकऱ्यांची पोलिसांकडे कारवाईची मागणी

  • अंधश्रद्धा निर्मूलनावर पुन्हा प्रश्नचिन्ह

अक्षय गवळी, अकोला

Akola Rambhau Namdev Bhad Fake Godman Video महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून असली, तरी अंधश्रद्धेच्या घटना अद्यापही समाजात खोलवर रुजलेल्या असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील पोही गावात एका भोंदू बाबाचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, रामभाऊ नामदेव भड उर्फ चंदनशेष किंवा चंदनमुरारी बाबा असे स्वतःला संबोधणाऱ्या व्यक्तीवर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या बाबाच्या अंगात दर सोमवारी आणि पौर्णिमेला ‘सवारी’ येते, असा दावा केला जातो. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, दर पौर्णिमेला आणि सोमवारी रात्री उशिरा या ठिकाणी ‘दरबार’ भरवला जातो. रात्री १ वाजल्यापासून सकाळपर्यंत भजन-कीर्तनाचा कार्यक्रम चालतो. मध्यरात्री बाबाच्या अंगात सवारी येते आणि ती सकाळपर्यंत टिकते, असा दावा भक्तांकडून केला जातो. या दरम्यान, बाबा भक्तांना विविध प्रकारचे उपाय सांगतो, जसे की लिंबू पिळणे, धागे-दोरे देणे, तसेच “तुला मूल होईल” किंवा “तू मला काय देणार?” अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जात असल्याचे आरोप आहेत.

यासाठी भक्तांकडून पैसे घेतले जात असून, ५० रुपयांच्या पावत्याही दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही या बाबाविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही हा प्रकार सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत या भोंदू बाबावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या ठिकाणी सुरू असलेला अंधश्रद्धेचा ‘बाजार’ बंद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT