Accident Saam Tv
महाराष्ट्र

Akola News : २ बहिणी स्कुटीवरून जात होत्या, त्याचवेळी काळाचा घाला, एकीचा जागेवरच मृत्यू

akola accident news : अकोल्यामध्ये भरधाव ट्रकने चिरडल्यामुळे चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर अकोटमध्ये संतप्त नागरिकांनी आंदोलन केले.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

Akola Accident News : अकोल्यामध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. भरधा ट्रकने स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी आहे. जखमीवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अकोटमधील नागरिकांनी आंदोलन करत रस्त्यावरच ठिय्या मांडला.

अकोल्यात ७ वर्षाच्या चिमुकल्या मुलीला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना रविवारी घडली आहे. या अपघातात सात वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातल्या रेल्वे पुलावर ही घटना घडली. काल रात्री उशिरा रेल्वे पुलावर स्कुटीने जाणाऱ्या दोघी बहिणीच्या स्कुटीला ट्रकने जोरदार धडक दिलीय. या अपघातात एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक हा कुटाराने भरलेला होता. अकोला-नाका ब्रिजवर ट्रक चढत असताना, समोरून येणाऱ्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत स्कुटीवरील निधी दिपक जेस्वानी हिला गंभीर मार लागला, आणि जागेवरच तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय.. दोघी बहिणी स्कुटीवरून घरी जात होत्या, त्यावेळी वाटतेच ही दुर्दैवी घटना घडली.

चिमुकलीच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी ठिय्या दिला. ट्रक चालकाला अटक करण्यात यावी, तोपर्यंत मृतदेह घेणार नाही, असा इशारा संतप्त जमावाने दिला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असून, या पुलावर स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, अद्यापही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा मुद्दाही जमावाने उपस्थित केलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT