Pravin Gaikwad after being attacked with black ink in Akkalkot over alleged remarks about Swami Samarth saam tv
महाराष्ट्र

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

Pravin Gaikwad claims Killed: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलंय.. मात्र त्याचं कारण काय? कोणत्या संघटनेनं प्रवीण गायकवाड यांना काळं फासलंय? पाहूयात...

Omkar Sonawane

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं आणि राज्यात एकच खळबळ उडालीय... संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा तर एका भाषणात स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत शिवधर्म फाऊंडेशनने प्रवीण गायकवाड यांना काळं फासलंय... तर गायकवाड यांना काळं फासल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक झालीय..

खरंतर प्रवीण गायकवाड नागरी सत्कार सोहळ्यासाठी अक्कलकोटला गेले होते.. त्यावेळी त्यांना काळं फासण्यात आलं...तर या घटनेचे राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटलेत..तर गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधत हा माझ्या हत्येचा कट होता, असा आरोप केलाय....

संभाजी ब्रिगेडने संघटनेच्या नावातील छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवला नाही तर त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा दिलाय.. त्यामुळे आगामी काळात संभाजी ब्रिगेड विरुद्ध शिवधर्म फाऊंडेशन हा वाद आणखीच पेटण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT