Akkalkot-Karnatak Highway Saam Tv
महाराष्ट्र

Akkalkot-Karnatak Highway: स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! राष्ट्रीय महामार्गासाठी ५५३ कोटींचा निधी मंजूर

Akkalkot-Karnatak Highway Project: अक्कलकोट ते कर्नाटकच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुदींकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. यासाठी ५५३ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

Siddhi Hande

स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी

महाराष्ट्र-कर्नाटक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मंजुरी

५५३ कोटींचा निधी मंजुर

देशभरातून अक्कलकोटला येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी मोठी गुड न्यूज आहे. महाराष्ट्र - कर्नाटक राज्य सीमेवरील 47 किमी रस्त्याचे रुंदीकरण आता होणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाला हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मंजुरी (Akkalkot Karnatak Nation Highway )

कर्नाटकवरुन अक्कलकोटला येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मंजुरी मिळाली असून त्यासाठी 553 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोटला स्वामीभक्त येतात.स्वामी भक्तांच्या वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने अक्कलकोटच्या रहिवाशांनी स्वागत केले आहे. अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारा दुवा

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार असल्याचा आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज हजारो भक्त अक्कलकोटला येतात. कर्नाटकवरूनदेखील अनेक भक्त अक्कलकोट, गाणगापुर येथे येतात. या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने एकाच वेळी जास्त वाहनांना प्रवास करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Care Tips: हे करून पाहा.. मग तुमच्या गाडीचा रंग केव्हाही उडणार नाही

Maharashtra News Live Update: शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज कल्याण कोर्टात हजर करणार

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

EPFO Pension Update: फक्त 10 वर्षे नोकरी केली तरी मिळेल महिन्याला पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Nashik News: अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार; नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT